ग्राम पंचायत पिंपळगाव (वा.)

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

वाखारी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ – १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान उपक्रम राबवले जाणार

वाखारी (ता. देवळा, जि. नाशिक) येथे १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान राज्यभर होणार असून, त्याअंतर्गत गावात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

वाखारी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ – १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान उपक्रम राबवले जाणार
वाखारी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ – १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान उपक्रम राबवले जाणार
ग्रामसभेत सेवा पंधरवडा, स्वच्छता ही सेवा, तसेच लोकसहभागातून राबवले जाणारे उपक्रम यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये:

महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम

युवकांसाठी करिअर मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी

स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रम

१०० गुणांची पत्रिका वाचून आरोग्य, शिक्षण, अपारंपरिक ऊर्जा, जलव्यवस्थापन आदी क्षेत्रांतील कामांचे गावस्तरावरील नियोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान एक सकारात्मक पाऊल ठरले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.